पुण्यात घरफोड्यांचे सत्र सुरुचं; भुसारी कॉलनीतील फ्लॅट फोडून तब्बल ‘इतक्या’ लाखांचा ऐवज लंपास

पुणे : पुण्यात घरफोड्यांचे सत्र सुरुचं आहे, चोरटे दररोज वेगवेगळ्या भागात घरफोड्या करत असल्याचे उघडकीस येत आहे. अशातच आता पुण्यातील भुसारी कॉलनीत बंद फ्लॅट फोडत चोरट्यांनी साडेचार लाखांचा ऐवज चोरला आहे. या प्रकरणी ८३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार उजवी भुसारी कॉलनीत सौदामिनी सोसायटीत राहतात. गणेश विसर्जनादिवशी ते घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. त्यादरम्यान, चोरटे दरवाजाचे कुलूप उचकटून घरात घुसले. तसेच लाकडी कपाटातील लॉकर तोडून कपाटातील दागिने व रोकड असा चार लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरून फरार झाला. तक्रारदार बुधवारी सकाळी सातच्या सुमारास आले असता घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. पोलिस उपनिरीक्षक मोहन चव्हाण अधिक तपास करत आहेत.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




