जालना-बीड रोडवर बस आणि कंटेनरचा भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती

जालना : अंबड तालुक्यातील सुखापुरी पासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर जालना बीड रोडवर आज सकाळच्या सुमारास कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात बसच्या कंडक्टरसह 5 जणांचा मृत्यू झाला व या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले असून, काहीजण अत्यंत गंभीर असल्याची माहिती समजते.

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार आज दिनांक 20 सप्टेंबर रोजी सकाळी साडे आठ ते नऊ च्या दरम्यान जालना बीड रोड वरील मठ तांडा येथे बस आणि आयशरचा भीषण अपघात झाला. यात अनेक जण जखमी असून, काही जणांची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याची माहिती मिळते. या भीषण अपघातातमुळे जालना बीड रोड वरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page