पुण्यात घरफोड्यांचे सत्र सुरुचं; दरवाजाचे कुलूप तोडून तब्बल ‘इतक्या’ लाखांचा ऐवज लंपास

पुणे : पुण्यात घरफोड्यांचे सत्र सुरुचं आहे, चोरटे पुण्यातील वेगवेगळ्या भागात दररोज घरफोड्या करत असून नागरिक यामुळे हैराण झाले आहेत. अशातच आता फ्लॅटच्या दरवाज्याचे कडीकुलुप तोडून चोरट्यांनी २ लाख ६८ हजारांचे सोन्या चांदिचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केल्याचा प्रकार कोंढवा परिसरात घडला आहे. याप्रकरणी गणेश विठ्ठल चव्हाण (वय ४९, रा. साळवे गार्डन समोर, कोंढवा) यांनी कोंढवा पोलिसांत तक्रार केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार चव्हाण हे साई पार्क बिल्डीग मध्ये राहायला आहे. ११ सप्टेंबर रोजी फ्लॅट बंद करुन बाहेर गेले होते. यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचा लोखंडी दरवाज्याचे कडी-कोंयडा कशाच्या तरी सहाय्याने तरी तोडून आत प्रवेश केला. तसेच घरातून २ लाख ६८ हजारांचे सोन्या चांदिचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक जाधव करत आहेत.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




