पुण्यात धावता ट्रक खड्ड्यात पडला; घटनेचा व्हिडिओ व्हायरल

पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यात एक धावता ट्रक खड्ड्यात पडल्याची घटना समोर आली आहे. पुण्याच्या समाधान चौकातील रोडच्या मध्यभागी असलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यात हा ट्रक पडून दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत कुठलीही जिवीतहानी झाली नसल्याची माहिती असून घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले. अखेर तीन ते साडे तीन तासानंतर हा टँकर बाहेर काढण्यात यश आले आहे.

Advertisement

पुण्यात रस्ता खचून खड्ड्यात पडलेला टँकर तीन तासांनंतर बाहेर काढला आहे. दोन क्रेनच्या सहाय्याने टँकर बाहेर काढण्यात यश आले आहे. पुणे शहरातील मुख्य पोस्ट ऑफिस असलेल्या सिटी पोस्टाच्या आवारातील जमीन अचानकपणे खचली. त्यामुळे निर्माण झालेल्या खड्ड्यात महापालिकेचा एक टँकर पडला होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत कुठलीही जिवीतहानी झाली नाही.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page