महात्मा गांधी जयंतीनिमित्त गोपाळकृष्ण शाळेत बालसभा

पुणे : गोखलेनगर येथील गोपाळकृष्ण प्राथमिक विद्यामंदिर या शाळेत महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त बालसभेचे आयोजन करण्यात आले होते.
Advertisement
बालसभेत समीक्षा रेवडे, दीप्ती जाधव, आरुषी शिंगाडे, निशा धोत्रे, संदेश भारस्कर, प्रतिभा चौहान,गिरुद्र कुसाळकर, वंश साळुंके, ईश्वरी कांबळे या विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे भाषणे केली.
मुख्याध्यापिका जयश्री कासार यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्याविषयी माहिती सांगितली. बालसभेचे नियोजन रणजित बोत्रे यांनी केले. यावेळी गीतांजली कांबळे, मंदाकिनी बलकवडे, दिपाली गावडे, विशाल चव्हाण उपस्थित होते.
Advertisement




