खंडणी विरोधी पथक -२ गुन्हे शाखे कडुन १ देशी बनावटीचे पिस्टल व १ जिवंत काडतुस जप्त..!

आज दि.२६/०४/२०२५ रोजी खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे व पवन भोसले यांना गोपणीय माहीती मिळाली की, गणेश आप्पा मकवाने वय २४ वर्षे, रा. गोसावी वस्ती, ओम साई जिम शेजारी, वडगाव बु सिंहगडरोड पुणे याचेकडे देशी बनावटीचे पिस्टल असुन तो वडगाव बु. पुणे या ठिकाणी आहे. त्याप्रमाणे सदरची खबर मिळताच खंडणी विरोधी पथक २ कडील स्टाफ त्या ठिकाणी रवाना झाले. आणि गोसावी वस्तीच्या मागील कॅनल लगतचे पायवाट, वडगाव बु.पुणे येथुन सदर इसमास ताब्यात घेतले असता त्याचेकडे १ देशी बनावटीचे पिस्टल व १ राऊंड मिळाला. त्याचे विरूध्द सिंहगडरोड पोलीस स्टेशन पुणे शहर येथे भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Advertisement

सदरची कामगिरी ही मा.अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. निखील पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे २ श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शानाखाली खंडणी विरोधी पथक २, गुन्हे शाखा, वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय कुंभार, पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे, चेतन चव्हाण, पवन भोसले, संग्राम शिनगारे, यांनी केलेली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page