पेट्रोप पंपावर दराेडा टाकण्याच्या तयारीतील टोळी जेरबंद; भारती विद्यापीठ पोलिसांची मोठी कारवाई

पुणे : पुण्यात पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी शनिनगर येथील एका खोलीत जमलेल्या बारा जणांना भारती विद्यापीठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ५ कोयते, ५ दुचाकी, मिरची पावडर, रस्सी असा २ लाख ५२ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
प्रथमेश ऊर्फ देवीदास कुडले (वय २३, रा. दत्तनगर), प्रकाश पाराजी काटे (वय २४, रा. दत्तनगर), करण संदीप चिकणे (वय २०, रा. सातववाडी, गोंधळेनगर, हडपसर), अजहर रमजान सय्यद (वय २३, रा. काशेवाडी, भवानी पेठ), सुशांत सुधाकर धोत्रे (वय १९, रा. संतोषनगर, कात्रज), आयाजन नियाज शेख (वय १९, रा. न्यू मोदीखाना, कॅम्प), रिहान रमजान सय्यद (वय २०, रा. काशेवाडी, भवानी पेठ), अरजान शाहीद शेख (वय १९, रा. नवीन नाना पेठ), फरहान सतीश येनपुरे (वय १९, रा. सारस सोसायटी, धनकवडी), दुर्गेश् हनुमंत सिद्धापुरे (वय १८, रा. फुरसुंगी, हडपसर), अंकीत राजू हकाळे (वय २१, रा. संतोषनगर, कात्रज) अशी अटक केलेल्या आराेपीचे नावे आहेत.
आरोपी हे एकमेकांचे मित्र असून मौजमजेसाठी पैसे पाहिजे असल्याने त्यांनी संगनमताने महामार्गावरील पेट्रोप पंपावरील रोकड लुटण्याचा कट रचला होता. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक कदम, पोलीस कर्मचारी मंगेश पवार, महेश बारवकर, निलेश ढमढेरे, हनमंत मासाळ,निलेश खैरमोडे, चेतन मोरे, धनाजी धोत्रे, सचिन सरपाले गस्त घालत होते. त्यावेळी शनीनगर चौकातील महादेव मंदिराजवळ असलेल्या एका पत्र्याच्या खोलीत काही जण जमले आहेत. त्यांच्याकडे तीक्ष्ण शस्त्रे असून, ते लूटमार करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांच्या पथकाला मिळाली. पोलिसांनी सापळा लावून त्यांना पकडले. त्यांच्याकडून पाच कोयते, पाच दुचाकी, मिरची पूड, दोरी असा मुद्देमाल जप्त केला.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




