क्रिप्टो करंन्सी देण्याच्या बहाण्याने बोलावुन जबरी चोरी करणा-या..!

दिनांक ११/०५/२०२६ रोजी विमानतळ पोलीस स्टेशन यातील हद्दीत फिर्यादी व त्यांचा मामाचा मुलगा यांना यातील आरोपी व त्यांचे अन्य तीन साथीदार यांनी झिरकॉन सोसायटी जवळ, विमाननगर पुणे येथे बोलावून फिर्यादी यांचे कडुन १,४०,०००/-रु. रोख रक्कम, दोन मोबाईल, एक अॅक्टिव्हा जबरदस्ती मारहाण करुन काढुन घेतले सदरबाबत विमानतळ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २४८/२०२६ भा.न्या.सं.क. ३०९ (६), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदर बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गोविंद जाधव यांनी तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक नितीन राठोड यांना तपास करण्याकरीता आदेशित केले होते. तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी आरोपी प्रणय अमर बुवा वय १९ वर्षे रा. धानोरी विश्रांतवाडी पुणे यास ताब्यात घेवुन त्याचेकडे कौशल्यपुर्ण तपास करता दाखल गुन्हा त्याने केला असल्याचे कबुल केले. दाखल गुन्ह्याचे तपासामध्ये नमुद आरोपी याने जबरदस्तीने काढुन घेतलेल्या रक्कमे पैकी २५,९४०/-रु. रोख रक्कम, ९०,०००/- रु. किं.चा अॅपल कंपनीचा मोबाईल, ५०,०००/-रु.किं.ची अॅक्टिव्हा दुचाकी असा एकूण १,६५,९४०/- रु.किं.चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उपायुक्त परि.०७ पुणे शहर श्री. सोमय मुंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, लोणीकंद विभाग (अति. कार्य. खराडी विभाग) पुणे शहर, श्रीमती नुतन पवार यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर श्री. गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) महेश बोलके यांचे सुचनांप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक नितीन राठोड, पोलीस अंमलदार लालु क-हे, रुपेश पिसाळ, अंकुश जोगदंडे, राहुल जोशी, योगेश थोपटे, सचिन मांजरे, अंबादास चव्हाण, हरीप्रसाद पुंडे, प्रशांत सुतार व सागर कासार यांचे पथकाने केली आहे.
चोरट्यास पोलीसांनी केले जेरबंद




