मराठवाड्यात 25 आमदार पाडणार, यादीही तयार; लक्ष्मण हाकेंचा इशारा

सोलापूर : राज्यभरात आरक्षणावरुन वातावरण तापलेल आहे. थोड्याच दिवसांत राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. अशातच आता जरांगे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवसापासून पुन्हा आमरण उपोषण सुरू करणार आहेत. पत्रकार परिषद घेत त्यांनी ही माहिती दिली आहे. यावरुन आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहेत. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फक्त मराठा जातीचे मुख्यमंत्री आहेत, त्यांना ओबीसीची ताकद या निवडणुकीत दिसेल, असंही हाके म्हणाले.

Advertisement

हाके पुढे बोलतांना म्हणाले की, मनोज जरांगे ज्या ठिकाणी उपोषणाला बसतील त्याच्या दुसऱ्या दिवशी, त्याच ठिकाणी ओबीसीचे उपोषण सुरू झालेले दिसेल. जरांगे यांना त्यांच्याच भाषेत आणि त्यांच्याच ताकदीने ओबीसी देखील उत्तर देतील. नुसत्या मराठवाड्यात 25 आमदार ओबीसींकडून पाडण्यात येणार आहेत. आमच्याकडे त्या 25 आमदारांची यादीही तयार आहे. त्यामुळेच आता काही आमदार निवडणूक न लढवण्याच्या भूमिकेत उतरू लागले, असा गौप्यस्फोटही लक्ष्मण हाके यांनी केला आहे.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page