घरफोडीचे गुन्हे करणा-या सराईत गुन्हेगाराला अटक करुन ३ गुन्हे आणले उघडकीस..!

चंदननगर पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये दाखल असलेले घरफोडीचे १) गु.र.नं.४७१/२०२५ भा.न्या.सं. कलम ३३१ (३) २) गु.र.नं. १६९/२०२६ भा.न्या.सं. कलम ३०५, ३२९ (४), ३३१ (१), ३३१ (३), ३३२ (क) व ३) गु.र.नं.१७०/२०२६ भा. न्यासं. कलम ३०५, ३३१ (१), ३३१ (३) या गुन्ह्यांचे घटनास्थळावरील तसेच आजु बाजुचे चौकामधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी चंदननगर पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली असता सदरचे तीन ही गुन्ह्यामधील आरोपी हा एकच असल्याचे दिसुन आल्याने सदरचे गुन्ह्याचे घटनास्थळावरील तसेच आजु बाजुचे चौकामधील व रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी करुन यातील आरोपीचा शोध घेतला असता तो रफिक हुसेन शेख वय ३२ वर्षे रा. चिंतामणीनगर, गल्ली नं ०३, सय्यदनगर, हडपसर, पुणे हा असल्याचे निष्पन्न झाले.

Advertisement

दाखल गुन्ह्यामधील निष्पन्न आरोपीचा त्याचे राहते घरी तसेच हडपसर परीसरामध्ये शोध घेऊन आरोपी नामे रफिक हुसेन शेख याला दिनांक १२/०५/२०२६ रोजी हडपसर पोलीस स्टेशने हद्दीमधुन चंदननगर पोलीस स्टेशनचे तपास पथकाने ताब्यात घेऊन त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने वरील तीन ही गुन्हे केल्याची कबुली दिल्याने त्याला चंदननगर पोलीस स्टेशन गु.र.नं.४७१/२०२५ भा.न्या.सं. कलम ३३१(३) या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आले आहे. नमुद आरोपीने सदरचे गुन्हे करण्यासाठी वापरलेले दुचाकी गाडी त्याचेकडुन जप्त करण्यात आलेली आहे. दाखल गुन्ह्यांचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक श्री. विकास बाबर हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-०७, पुणे शहर श्री. सोमय मुंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, खराडी विभाग, पुणे शहर श्रीमती नुतन पवार यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंदननगर पोलीस स्टेशन श्री. निलेश बडाख यांचे सुचनांप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक गणेश जगदाळे, सहा. पोलीस निरीक्षक विकास बाबर, सहा. पोलीस निरीक्षक महेश लामखेडे, पोलीस उप-निरीक्षक अमोल घोडके पोलीस अंमलदार मेमाणे, डांगे, मुलाणी, घुटे, कदम, पाटील, लहाणे व बेंद्रे यांनी केली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page