अजित पवार गटाचे 25 उमेदवार ठरले; संभाव्य नावांची यादी समोर

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत बैठकीतून मोठी बातमी समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे २५ उमेदवार ठरले आहेत. विशेष म्हणजे अजित पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघातूनच लढणार आहेत. २५ उमेदवारांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश या बैठकीत देण्यात आले आहेत.
महाय़ुतीत जागावाटपाची चर्चा सुरू असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसनं आपले २५ उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. महायुतीची चर्चा सुरु आहे, पण काही निवडक जागांवर आतापासून तयारी सुरू करावी आणि कामाला लागावे, या दृष्टीने अजित पवार यांच्या गटाने आपला पहिला डाव टाकला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य २५ उमेदवार कोण आहेत?
बारामती : अजित पवार
उदगीर : संजय बनसोडे
आंबेगाव : दिलीप वळसे-पाटील
दिंडोरी : नरहरा झिरवळ
येवला : छगन भुजबळ
पुसद : इंद्रनील नाईक
वाई खंडाळा महाबळेश्वर : मकरंद आबा पाटील
पिंपरी : अण्णा बनसोडे
परळी : धनंजय मुंडे
इंदापूर : दत्ता भरणे
रायगड : अदिती तटकरे
कळवण : नितिन पवार
मावळ : सुनील शेळके
अमळनेर : अनिल पाटील
अहेरी : धर्मराव बाबा अत्राम
कागल : हसन मुश्रीफ
खेड : दिलीप मोहिते-पाटील
अहमदनगर : संग्राम जगताप
जुन्नर : अतुल बेनके
वडगाव शेरी : सुनील टिंगरे
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




