अजित पवारांनी महिला चालवित असलेल्या रिक्षाने केला प्रवास

पिंपरी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड येथे महिला चालक असणार्‍या रिक्षातून प्रवास केला. चालक महिलेस पवार यांनी प्रोत्साहन दिले. जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे पिंपरी चिंचवड शहरांमध्ये आले होते. निगडी येथील भक्ती शक्ती शिल्प तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार
अर्पण केला.

Advertisement

त्यानंतर निगडी येथील देशातील पहिले महिला रिक्षा स्टॅन्ड येथील रिक्षामधून अजित पवार यांनी रिक्षाने निगडी पर्यंत प्रवास केला. यावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायत संस्थापक अध्यक्ष बाबा कांबळे, घर का महिला सभा अध्यक्ष आशा कांबळे सह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

मी तुमचा भाऊ आहे. सावत्र भावांपासून सावध रहावे. सावत्र भाऊ खोटे-नाटे सांगत आहेत. हौसेगवसे-नवसे काहीपण बोलतात. त्याचा महायुतीला फटका बसतो. मी अर्थमंत्री म्हणून सांगतो लाडक्या बहिणीची ही ओवाळणी माघारी घेतली जाणार नाही. असेही पवार म्हणाले.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page