गाडी घासल्याच्या कारणांवरुन हवेत गोळीबार करुन दहशत करणा-या गुन्हेगारांना केली अटक..!

दि. ०४/०८/२०२५ रोजी कोल्हेवाडी येथे गाडी घासल्याच्या कारणांवरुन हवेत ३ गोळी फायर करुन आरोपी फरार झाले होते. वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. अतुल भोस यांनी तात्काळ गुन्ह्यातील आरोपर्षीचा शोध घेणे बाबत आदेशीत केले होते. सदर घटनेची माहीती घेत असताना व आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार स्वप्नील मगर, बंटी मोरे, संग्राम शिनगारे यांना त्यांचे गोपणीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदर ठिकाणी फायरींग करणारे आरोपी हे खडकवासला चौपाटी येथे थांबलेले आहेत वगैरे मजकुरची बातमी मिळाल्याने सदरची बातमी वरीष्ठ पोलीस निरीक्षक, अतुल भोस यांना कळविली असता त्यांना ताब्यात घेण्याबाबत सुचना दिल्या. त्यानंतर सपोनि राहुल यादव, तसेच पोलीस स्टॉफ असे बातमीच्या ठिकाणी खात्री करता बातमीचे वर्णनाप्रमाणे सहा इसम संशयितरित्या थांबलेले दिसल्याने त्यांना ताब्यात घेतले असुन त्यांचेवर नांदेडसिटी पोलीस स्टेशन गु.रजि.नं. १५९/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८(१), १८९(२),१८९ (४), १९०, १९१(२),३५१ (२) (३), ३५२ सह आर्म अॅक्ट कलम ३.२५.२७ तसेच क्रिमिनल अॅमेंटमेंट कलम ७ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१), १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. आरोपी नामे १) साहिल आरविंद चव्हाण वय-२४ वर्षे रा. सप्तगिरी हाईट्स खडकवासला पुणे, २) अभिजीत राजु चव्हाण वय ३१ वर्षे रा. तिरुमल हाईट्स कोल्हेवाडी पुणे, ३) प्रशांत यशवंत चव्हाण वय-३४ वर्षे रा. सप्तगिरी हाईट्स लमाणवाडी खडकवासला पुणे, ४) आकाश भिमा चव्हाण वय-२४ वर्षे रा. तिरुमल हाईट्स खडकवासला पुणे, ५) गितेश शंकरजाधव वय-२० वर्षे रा. नानाजी व्हिलाच्या पाठीमागे खडकवासला पुणे, ६) मंदार यशवंत चव्हण वय-३९ वर्षे, रा. सप्तगिरी हाईट्स लमाणवाडी खडकवासला पुणे यांना अटक करण्यात आलेली आहे. सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. राजेश बनसोडे मा. पोलीस उप आयुक्त परि ३ पुणे, श्री. संभाजी कदम, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग पुणे श्री. अजय परमार यांचे मार्गदर्शनाखाली नांदेडसिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अतुल भोस, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गुरुदत्त मोरे, सहा. पोलीस निरीक्षक राहुल यादव, प्रविण जाधव, पो.उप. निरीक्षक कसबे पोलीस अंमलदार संग्राम शिनगारे, राजु वेगरे, प्रतिक मोरे, स्वप्नील मगर, मोहन मिसाळ, शिवा क्षीरसागर, भिमराज गागुर्डे, उत्तम शिंदे, निलेख कुलथे, अक्षय जाधव, सतिश खोत, निलेश खांबे यांच्या पथकाने केली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page