लाडकी बहीण योजनेत फसवेगिरी करणाऱ्यांना अजित पवारांचा इशारा, म्हणाले…

पुणे – राज्य सराकरनं महिलांना आर्थिक मदतीसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. जुलै महिन्यापासून या योजनेची अंमलबजावणी केली जातेय. राज्य सरकारनं आतापर्यंत एक कोटी 59 लाख महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3000 रुपये दिले आहेत. या योजनेचा काही जण गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत असल्याची प्रकरणं उघडकीस येत आहेत. यावरुन आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इशारा दिला आहे.
पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले की, बऱ्याच महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत आणि त्याच महिला लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेऊ इच्छितात. पण त्या महिलांनी हे लक्षात घ्यावे की, तुम्हाला एकाच योजनेचा लाभ मिळेल. सगळंच पाहिजे असेल तर सरकारची तिजोरी खाली होईल. त्यामुळे आता ब्रम्हदेव आला तरी शक्य नाही. एका दाम्पत्याने तर लाडकी बहीणसाठी 26 वेळा अर्ज केला अन् लूट केली. आम्ही देतो याचा अर्थ तुम्ही फसवणूक करू शकत नाहीत. फसवणूक केली तर मग आम्ही तुरुंगातही टाकतो. मग करा चक्की पिसिंग, असा इशारा अजित पवार यांनी दिला.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




