महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? ; शरद पवार म्हणाले…

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुती आणि महाविकाआघाडीत जोरदार मोर्चेंबांधणी सुरु आहे. त्यातच आता महाविकासआघाडीकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार याबद्दल विविध चर्चा रंगत आहेत. आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शरद पवारांनी महाविकासाआघाडीत कोण मुख्यमंत्री होणार? याबाबत भाष्य केलं आहे.
महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासंबंधीचं घोडं नेमकं कुठे अडकलं आहे, असा प्रश्न विचारलाअसता शरद पवार म्हणाले की,”मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याचा आताच विचार कऱणे आवश्यक नाही. आमही जी आघाडी केली आहे त्यांचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे मग तो राष्ट्रवादीचा करा, तो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा करा किंवा काँग्रेसचा करा काहीच हरकत नाही. मुख्यमंत्री पदाचा निर्णय हा संख्याबळावर होईल. त्यामुळे आताच नाव जाहीर केलं पाहिजे, याचा आग्रह करण्याची काहीच गरज नाही, आम्ही सर्वजण एकत्र बसू, लोकांचा पाठिंबा मिळाल्यानंतर एक स्थिर पर्याय राज्यासाठी दिला जाईल. हेच आमचे उद्दिष्ट आहे.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




