हत्येच्या थरारानं नागपूर हादरलं; मनोरुग्णानं दिसेल त्याला चोपलं

नागपूर – नागपूरमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक सातवर दोघांची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनं संपूर्ण नागपूर रेल्वे स्थानक हादरलं आहे.
काय घडलं नेमकं?
नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक सातवर ऐन गर्दीच्यावेळी एक मनोरुग्ण हातात लाकडी राफटर घेऊन स्थानकावर उभ्या असलेल्या लोकांवर हल्ला करत सुटला. रेल्वे रुळाच्या कामासाठी वापरात येणाऱ्या लाकडी राफ्टरने लोकांवर तो हल्ले करत होता. अचानक घडलेल्या या घटनेने स्थानकावर एकच खळबळ उडाली. लोकं सैरावैरा पळू लागली. आरोपीने चार लोकांवर हल्ला केला. यात अतिरक्तस्त्रावामुळे दोघांचा मृत्यू झाला. तर दोघांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची मृत्यूशी झुंज सुरु आहे.
हल्ला केल्यानंतर आरोपी रेल्वे रुळावरुन पळू लागला. त्याचवेळी रेल्वे कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावत आरोपीचा पाठलाग करुन त्याला पकडलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जयराम केवट असं आरोपीचं नाव असून तो 35 वर्षांचा आहे. आरोपी मनोरुग्ण असल्याची माहिती मिळतेय. याबाबत नागपूर लोहमार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




