जरांगे पाटलांचा मराठवाड्यात जाऊन समाचार घेणार, नारायण राणेंचा इशारा

सावंतवाडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या वर उठसूठ टीका करणाऱ्या उध्दव ठाकरे याला जशास तसे उत्तर दिले जाईल तर देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणाऱ्या मनोज जरांगेचा मराठवाड्यात जाऊन समाचार घेणार असल्याचा इशारा माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी दिला.

राणे म्हणाले, मराठवाड्यात जाती- जातीमध्ये भेदभाव निर्माण केला गेला आहे. दोन समाजात भांडणं लावण्याचे काम सुरु आहे, त्यामुळे मी लवकरच मराठवाड्याचा दौरा करणार आहे. मराठवाड्यातील वातावरण सुधारण्याच्या दृष्टीने माझा हा प्रयत्न असणार आहे. आमच्या भजप नेत्यांबद्दल जरांगे वाटेल तसे बोलत आहेत. मनोज जरांगे यांनी भाजपच्या अन्य नेत्यांवर बोलू नये, त्यांच्यावर बोलले तर आम्ही जरांगे पाटलांना उत्तर देऊ, असाही इशारा राणे यांनी दिला.

Advertisement

सिंधुदुर्ग भाजपचे विस्तारित कार्यकारिणीचे अधिवेशन उद्घाटन खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार,राजन तेली, माजी नगराध्यक्ष संजू परब, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, महेश सारंग, भाजपचे युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब आदी उपस्थित होते.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page