गुंतवणूकीवर नफ्याचे आमिष दाखवून एकाची फसवणूक; तब्बल ‘इतक्या’ लाखांना घातला गंडा

पिंपरी : शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एकाची ३८ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार पुनावळे येथे घडला. याप्रकरणी पुनावळे येथील ४२ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे.

Advertisement

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळवून देण्याचे फिर्यादी यांना आमिष दाखवले. त्यानंतर फिर्यादी काही स्टॉक घेण्यास सांगून तसेच टॅक्स भरण्यासाठी व ॲप अनलॉक करण्यासाठी फिर्यादी यांना वेगवेगळ्या बँक खात्यावर पैसे भरण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी तीन बँक खात्यावर ३८ लाख ८२ हजार रुपये पाठवले. मात्र, नंतर फिर्यादीने वारंवार पैसे मागूनही त्यांना परत न देता त्यांची फसवणूक केली.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page