पुण्यात नेमकं चाललंय तरी काय? दुचाकीस्वाराने पोलिस हवालादाराला नेले फरफटत

पुणे : वाहतूक नियमाचे उल्लंघन करून दुचाकी चालविणार्‍या तरुणाला थांबविण्याचा प्रयत्न केल्यानंतर चालकाने पोलिस हवालादाराला शंभर मीटर फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याघटनेत पोलीस हवालदार जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी ऋतिक प्रकाश हिंगणे (वय 34, रा.हिंगणेमळ हडपसर) याला अटक केली आहे. तर चेतन सुलाखे असे जखमी झालेल्या पोलीस हवालादराचे नाव आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास हडपसर वाहतूक विभाग कार्यालायाच्या बाजूला घडली आहे.

Advertisement

पोलिसांच्या माहितीनुसार, सुलाखे हडपसर इंडस्ट्रीयल इस्टेट रोडवर वाहतू्क नियमनाचे कर्तव्य करत होते. तेव्हा ऋतिक हा विना नंबरप्लेट, विम्याची मुदत संपलेली दुचाकी घेऊन येत होता. सुलाखे यांनी त्याला वाहन चालविण्याचा परवाना विचारून दुचाकी बाजूला घेण्यास सांगितले. मात्र ऋतिक दुचाकी घेऊन पळून जाऊ लागला. त्यावेळी सुलाखे यांनी त्याला पकडून ठेवले. परंतु तरीही ऋतिकने दुचाकी जोरात चालवून सुलाखे यांना शंभर मिटर फरफटत नेले. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page