मद्यपी वाहनचालकाकडून पोलिसांना धक्काबुक्की, पुणे स्टेशन परिसरातील घटना

पुणे : पुणे शहरात पोलिसांना मद्य पिलेल्या वाहन चालकांनी तपासणीदरम्यान धक्काबु्क्की करुन धमकी दिल्याची घटना घडली. पुणे रेल्वे स्थानक परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांत शशांक अवध त्रिपाठी (वय ३६, रा. वाघोली) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी दीपमाला नायर यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानक परिसरात पोलीस कर्मचारी दीपमाला नायर तसेच अधिकाऱ्यांनी नाकाबंदी करुन मद्यपी वाहनचालकांची तपासणी करण्यास सुरुवात केली. तर त्यावेळी पोलिसांनी नाकाबंदीत कार चालक त्रिपाठीला अडवले. त्याची तपासणी करण्यास सुरुवात केली.
पोलिसांनी अडवल्याने त्रिपाठी चिडला.‘ तुम सबको मैं घर बिठाउंगा, कल बताता हू मैं कोन हू’ अशी धमकी दिली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्रिपाठीवर गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता तपास करत आहेत.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




