फुलचंद पानातुन नशेकरीता वापरत असलेला मादक पदार्थ विक्री करीता आणलेल्या..!

दिनांक २८/०४/२०२६ रोजी शिवाजीनगर पोलीस स्टेशन ठाणेकडील तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, व स्टाप असे पोलीस ठाणे हददीत गस्त करीत असताना पोलीस अंमलदार सचिन जाधव यांना खास बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, दिनदयाळ हॉस्पीटल जवळील निर्जन रस्त्यावर, शिवाजीनगर, पुणे याठिकाणी ब-याच वेळापासुन एक मोटार टेम्पो बेवारस व संशयास्पद स्थितीत उभा आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच सपोनि. संतोष पाटील व सोबतच्या स्टाप सह तात्काळ रवाना होवुन खात्री केली.

सदर ठिकाणी एक मोटार टेम्पो बेवारस स्थितीत उभा असल्याचे पोलीस पथकाला दिसले त्यावरुन सदर टेम्पोच्याजवळ जावुन त्याची संशयास्पदरित्या पाठीमागील बाजुकडील दरवाजाची कडी उघडुन खात्री करणेकरीता आतमध्ये पाहिले असता त्यामध्ये प्रतिबंधित व बेकायदेशीर असलेली मादक अशा बंटयांच्या गोळया असलेली पाकिटे असलेली गोण्या मिळुन आल्या असुन सदरचा मो/टेम्पो व मुददेमाल असा एकुण ३,३८,८८०/-रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आलेला आहे तरी त्याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाणे, पुणे येथे तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन सदर गुन्हयाचे तपासादरम्यान पोलीसांनी नमुद प्रकरणात विष्णु रामरतन गुप्ता, वय ३० वर्षे रा. पिंपरी चिंचवड, पुणे या आरोपीचे नाव निष्पन्न करुन तात्काळ सदर आरोपीस अटक केलेली आहे.

Advertisement

तसेच सदर गुन्हयात इतर आरोपी यांचा सहभाग आहे का अगर कसे? याबाबत तपास चालु असुन पोलीसांनी केलेल्या तपासात सदर गुन्हयातील जप्त करण्यात आलेल्या बंटयांच्या गोळ्या या अलीकडे पुण्यात फुलचंद पानात देखील वापरत असल्याबाबत प्राथमिक माहिती समोर आलेली आहे त्याबाबत देखील पोलीसांचा अधिक तपास चालु आहे.

सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. राजेंद्र बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त परि-१ श्री. कृषीकेश रावले, मा. सहा. पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग श्री. चंद्रकांत भोसले, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गिरीशकुमार दिघावकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमर काळंगे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस अंमलदार सचिन जाधव, महावीर वलटे, राजकिरण पवार, इसाक पठाण, मोहिते, दिपक रोमाडे, श्रीकांत मखरे यांनी

आरोपीस केले जेरबंद

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page