दारुड्याने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला अन्…; पुण्यात पोलिसांची धावपळ

पुणे : दारू पिल्यानंतर एकाने थेट दारुच्या नशेत पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला अन् खोटी माहिती दिली. त्याच्या या खोट्या माहितीमुळे मात्र, काहीवेळ पुणे पोलिसांची तारांबळ उडाली. त्यामुळे दिशाभूल करणाऱ्या या तरुणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रोहित मुकेश चव्हाण असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीस कर्मचारी विवेक पाटील यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, चव्हाण मंगळवार पेठेतील कमला नेहरु रुग्णालयसमोर थांबलेला होता. तो दारुच्या नशेत होता. त्याने पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षात फोन केला आणि मला पोलीस मदत हवी आहे, ३० ते ४० जण तलवार घेऊन मंगळवार पेठेत फिरत आहेत. माझ्या जीवाला धोका आहे, अशी माहिती दिली. त्यानंतर पोलीस नियंत्रण कक्षाने त्वरीत फरासखाना पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
चौकशीत असा प्रकार घडला नसल्याचे उघड झाले. पोलिसांनी तपास सुरु केला. दिशाभूल करून खोटी माहिती दिल्याप्रकरणी चव्हाणविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक डुकरे तपास करत आहेत.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




