तम्मा कुसाळकर टोळीतील फरार सराईत गुन्हेगार जेरबंद; पुणे पोलिसांची कारवाई

पुणे : तरुणावर प्राणघातक हल्ला करुन गेली १८ महिने फरार असलेल्या तम्मा कुसाळकर टोळीतील सराईत गुन्हेगाराला पकडण्यात शिवाजीनगर पोलिसांना यश आले आहे. धनंजय राजेंद्र गावडे (वय ३०, रा. न. ता. वाडी, शिवाजीनगर) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.
धनंजय गावडे हा तम्मा कुसाळकर टोळीचा सदस्य असून त्याच्यावर खूनाचा प्रयत्न, मारामारी, आर्म अॅक्ट असे ५ गुन्हे शिवाजीनगर, डेक्कन, विमानतळ पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील तपास पथक मनपा बसस्टॉड परिसरात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, धनंजय गावडे हा त्याच्या घरी आला आहे. या माहितीची खातजमा करण्यासाठी पोलिसांनी त्याच्या घरावर छापा घातला. तेव्हा तो मिळून आला.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, पोलीस हवालदार दीपक चव्हाण, प्रमोद मोहिते, पोलीस अंमलदार सचिन जाधव, महावीर, वलटे यांनी केली.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




