” दुचाकी वाहन चोरास केले जेरबंद”..!

लोहगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर कडील गु.र.नं. ७१/२०२६ भा.न्या.स. क ३०३ (२) दुचाकी एका अज्ञात इसमाने चोरुन नेले बाबत दिनांक ०६/०२/२०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयात फिर्यादी यांचे राहते घराचे पार्कीग मधुन अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांची दुचाकी चोरी करुन नेली.
त्याप्रमाणे लोहगांव पोलीस ठाणे, पुणे शहर तपास पथकातील पोलीस अंमलदार जोतीराम देवकाते यांनी घटनास्थळावरील व आजुबाजुचे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. सदर फुटेजमध्ये एक संशयीत इसम हा दुचाकी चोरुन घेवुन जाताना दिसुन आला. पोलीस अंमलदार जोतीराम देवकाते यांना त्यांचे गोपनीय बातमीदारा मार्फत सदरचा इसम हा अमन शेशराव कांबळे, रा.शिवशंभो पार्क लेन. न.०४ पठारेवस्ती लोहगाव पुणे असा असल्याचे निष्पन्न केले. सदर आरोपी हा संतनगर परिसरात मोटार सायकल सह फिरत असल्याचे गोपणीय बातमी मिळाले नंतर लोहगांव पोलीस ठाणे तपास पथकातील पोलीस अंमलदार ज्योतीराम देवकाते, बाळासाहेब शिरसाठ व हरी पुंडे यांनी सापळा रचुन आरोपीकडुन गुन्हयातील चोरीस गेलेली मोटार सायकल जप्त करण्यात आलेली.
सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ ०७ श्री. सोमय मुंडे, मा. सहायक पोलीस आयुक्त, लोणीकंद विभाग, पुणे शहर श्रीमती नुतन पवार यांचे आदेशान्वये मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीमती मनीषा पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक मनोज बरुरे, पोलीस अंमलदार गणेश इथापे, जोतीराम देवकाते, दादासाहेब बर्डे, ज्ञानदेव आवारी, हरीप्रसाद पुंडे, बाळासाहेब शिरसाठ यांचे पथकाने केली.




