राधाकृष्ण विखे पाटलांच्या ताफ्यातील कारचा अपघात; 2 जण गंभीर जखमी

अहमदनगर : महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे लोणी येथून संगमनेर शहरात एका कार्यक्रमासाठी येत असताना शहर पोलीस ठाण्याचे वाहन आणि पालकमंत्री विखे-पाटील यांच्या ताफ्यातील कार्यकर्त्यांचे वाहन यांच्यात धडक झाली. या अपघातत महिला पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी असे दोन जण जखमी झाले. या अपघातात कारमधील दोन पोलीस कर्मचारी गंंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने दोघांचीही प्रकृती स्थिर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी राधाकृष्ण विखे पाटील यांचा ताफा संगमनेरकडे निघाला होता. त्याचवेळी त्यांच्या ताफ्यातील पोलिसांची कार समोरून येणाऱ्या एका वाहनाला जोरदारपणे धडकली. अपघातात कारमधील दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याने त्यांना संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातात महिला अधिकारी पडवळ यांच्या उजव्या पायाला दुखापत झाल्याची माहिती आहे. तर या अपघाताची माहिती समजताच स्थानिक नागरिकांनीही अपघातस्थळी नागरिकांनी धाव घेत बचावकार्यास मदत केली. रात्री उशिरा अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




