माजी गृहराज्यमंत्र्याच्या मुलाच्या हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा; पुणे पोलिसांची मोठी कारवाई

पुणे : बेकायदा हुक्का पार्लरवर छापा टाकत कारवाई करून पुणे पोलिसांनी माजी गृहराज्यमंत्र्यांच्या मुलासह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. येथून तंबाखूजन्य हुक्का फ्लेवर, हुक्का पॉट असा २३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. छुप्या पद्धतीने हा व्यवसाय सुरू होता. कोंढव्यातील द व्हिलेज हॉटेलवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. बाकीर रमेश बागवे (३६, रा. भवानी पेठ), हरून नबी शेख (२५), बिक्रम साधन शेख (२०), अमानत अन्वर मंडळ (२२), अमानत अन्वर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यातील बाकीर माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांचा मुलगा आहे.
मिळालेल्या माहितीनंतर कारवाई
कोंढवा भागातील व्हिलेज हॉटेलमध्ये अवैधरित्या नागरिकांना हुक्का पुरविला जात असल्याची माहिती कोंढवा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. हा संबंधित हुक्का पार्लर हा माजी गृहराज्यमंत्र्याच्या मुलाचा असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील काँग्रेस नेते व माजी शहराध्यक्ष रमेश बागवे यांचा मुलगा हा हुक्का पार्लर चालवत होता. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, कोंढवा पोलीस तपास करत आहेत.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




