कोंढव्यातील मॅश हॉटेलमधील हुक्का पार्लरवर छापा; 5 जणांवर गुन्हा दाखल

पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील कोंढव्यातील मॅश हाॅटेलमध्ये सुरू असलेल्या बेकायदा हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तंबाखूजन्य पदार्थ, हुक्का पात्र असा ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी मॅश हाॅटेलचे मालक अली इरानी (वय ६६, रा. उंड्री), व्यवस्थापक अली सय्यद (वय २८, रा. येरवडा), कामगार थॉमस सुजय मंडल (वय ३०, रा. उंड्री), रंजन समर्थ पत्रा (वय २७, रा. उंड्री), राजकुमार वामन पंडीत (वय ३०, रा. महमदवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विनय पाटणकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली. महिनाभरापूर्वीच कोंढव्यातील एका हॉटेलमध्ये सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा टाकला होता. त्यानंतर आता पुन्हा एका हॉटेलमध्ये बेकायदा हुक्का पार्लर सुरू असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, कोंढवा परिसरात पोलीस गस्त घालत होते. तेव्हा गस्त घालणाऱ्या पथकाला मॅश हॉटेलमध्ये हुक्का पुरवला जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीची खातरजमा करण्यात आली. नंतर पोलिसांच्या पथकाने कोंढव्यातील न्याती चौक परिसरात असलेल्या हॉटेलवर छापा टाकून कारवाई केली.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




