वाहन चोरी करणा-या सराईत गुन्हेगारास अटक..!

विश्रामबाग पो.स्टे. गु.र.नं. ३५७/२०२५ बीएनएस कलम ३०३ (२) प्रमाणे दाखल गुन्हयाचा समांतर तपास युनिट १ गुन्हे शाखा करीत असताना दिनांक १८/०३/२०२६ रोजी श्रे. पोलीस उप निरीक्षक राहुल मखरे, पोलीस अंमलदार पेरणे, जमदाडे, काकडे, डोंगरे, मठपती, साबळे, असे मिळून वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्या सुचनांच्या अनुषंगाने वर नमुद गुन्हयातील आरोपी याचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार मठपती यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फतीने बातमी मिळाली की, वर नमुद गुन्हयातील दु- चाकी चोरी करणारा आरोपी हा गल्ली नं.२, सुपर इंदिरानगर, अप्पर बिबवेवाडी पुणे. येथे राहण्यास आहे. वरिल मजकुराची माहीती मिळताच सदरची माहीती पोलीस निरीक्षक युनिट १ गुन्हे शाखा अजित जाधव पुणे शहर यांना कळविली असता त्यांनी सदरबाबत खात्री करून योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश दिले व मार्गदर्शन केले.

Advertisement

त्यानंतर युनिट १ कडील पोलीस अधिकारी व स्टाफ असे गल्ली नं.२, सुपर इंदिरानगर, अप्पर बिबवेवाडी पुणे. येथे त्याचे दिले पत्त्यावर जावून शोध घेतला असता इसम नामे सुरज शिवाजी सुरवसे वय २५ वर्ष रा. गल्ली नं.२, सुपर इंदिरानगर, अप्पर बिबवेवाडी पुणे. हा मिळुन आला त्याचेकडुन दाखल गुन्हयातील चोरीस गेलेली २५,०००/- रु किंमतीची एक होंडा कपनीची युनिकॉर्न मॉडेल असलेली, सिल्वर रंगाची टु-व्हिलर तिचा आर.टी.ओ. नं. एम.एच.१२ जी.पी.३३६१ अशी जप्त करण्यात आली असुन पुढील तपास विश्रामबाग पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री निखील पिंगळे, मा. सहा पोलीस आयुक्त गुन्हे- १ श्री. शैलेश संखे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजित जाधव व पोलीस अंमलदार अमित जमदाडे, हेमंत पेरणे, मठपती, शशिकांत दरेकर, संदेश काकडे, म.पो. अंमलदार ज्योती मुल्का, डोंगरे व प्रफुल शेलार यांनी केली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page