पुणे शहरातील बुधवारपेठ रेड लाईट भागात पोलीसांची सगळयात मोठी कारवाई..!

पुणे शहरातील बुधवारपेठ रेड लाईट भागामध्ये चालणारे गैरव्यावहार व गैरकायदेशीर कृत्य याबाबत सदर ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन राबविणे बाबत मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. अमितेश कुमार यांनी आदेश दिले होते. त्याप्रमाणे पुणे शहर आयुक्तालयातील ०२ पोलीस उप-आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली विविध पोलीस स्टेशन तसेच गुन्हे शाखेकडील ०८ सहा पोलीस आयुक्त, १९ पोलीस निरीक्षक, ५५ सहा. पोलीस निरीक्षक / पोलीस उप-निरीक्षक, ३७५ अंमलदार यांचे मार्फतीने कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले.

सदर कोंबिंग ऑपरेशन दरम्यान ४१ बिल्डींग चेक करण्यात आल्या असुन एकुण ४२६ महिला व २९० पुरुष चेक करण्यात आले तसेच लावण्यात आलेल्या ०५ नाकाबंदी ठिकाणी एकुण ४५९ पुरुष व ३२ वाहने चेक करण्यात आली आहे. नाकाबंदी दरम्यान हॉटेल चेतक समोरील सार्वजनिक रोडवर स.नं. १०५८ बुधवारपेठ पुणे येथे इसम नामे रामेश्वर बिभीषण बिराजदार, वय ३१ वर्षे, रा. गणराज हॉटेलच्या पार्कीगमधील रुममध्ये, बाजीराव रोड पुणे. मुळगाव तांबरवाडी, ता. औसा, जि. लातुर याचे ताब्यात ०७ ग्रॅम चरस कि.रु.३,५००/- व ०३ इंजेक्शन किं.रु.५५/- असा मुद्देमाल अनाधिकारने जवळ बाळगताना मिळुन आल्याने त्याचे विरुध्द फरासखाना पोलीस स्टेशन गु.र.नं.२६/२०२६ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (अ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Advertisement

सदर कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान ०२ संशयित बांगलादेशी महिला व काही अल्पवयीन मुली मिळुन आल्याने त्यांना पुढील सुरक्षेच्या कारणास्तव फरासखाना पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असुन खातरजमा करण्यासाठी पोलिस स्टेशनच्या मार्फत कारवाई चालु आहे.

वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. निखील पिंगळे, यांचे मार्गदर्शनाखाली पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडील मा. पोलीस उपआयुक्त परि-०१, पुणे शहर श्री. कृषीकेश रावळे, मा. सहा पोलीस आयुक्त फरासखाना श्रीमती, अनुजा देशमाने, मा. सहा पोलीस आयुक्त गुन्हे १, श्री. शैलेश संखे, मा. सहा पोलीस आयुक्त गुन्हे ३ श्री, शंकर खटके, मा. सहा पोलीस आयुक्त सिंहगडरोड श्री. अजय परमार, मा. सहा पोलीस आयुक्त स्वारगेट, श्री. राहुल आवारे, मा. सहा पोलीस आयुक्त लष्कर, श्रीमती संगिता अल्फानसो शिंदे, मा. सहा पोलीस आयुक्त येरवडा, श्री. सुनिल जैतापुरकर तसेच विविध पोलीस स्टेशनकडील १९ पोलीस निरीक्षक, ५५ सहा. पोलीस निरीक्षक/पोलीस उप-निरिक्षक, ३७५ पोलीस अंमलदार यांनी केली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page