पुण्यात कोयता गँगची दहशत; पोलीस अधिकाऱ्यावरच केला हल्ला

पुणे – पुण्यात गेल्या काही वर्षांपासून कोयता गँगची मुजोरी वाढल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्था अनेकदा राज्यभरात चर्चेचा विषय ठरली आहे. पुण्यात आज भांडण सोडवायला गेलेल्या एका पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्यानं हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेतील जखमी पोलीस अधिकाऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रत्नदीप गायकवाड असे हल्ल्यात जखमी जालेल्या सहाय्यक पोलीस निरिक्षकाचं नाव आहे.

Advertisement

निहाल सिंग नावाच्या आरोपीने सहाय्यक पोलीस निरिक्षक रत्नदीप गायकवाड यांच्यावर हल्ला केला. निहाल सिंग हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याने याआधीही पोलिसांवर हल्ले केले आहेत, अशी माहिती समोर आली आहे. हल्ल्यावेळी दुसरा आरोपी राहुल सिंगही तिथे होता, तोही रेकॉडवरील आरोपी आहे. या दोघांकडे यापूर्वी अवैध पिस्तुल देखील आढळून आलं होतं.

दोन टोळ्यांमध्ये हाणामारी सुरू असताना सहाय्यक पोलीस निरिक्षक गायकवाड आरोपींना पकडायला गेले होते, तेव्हा आरोपीने त्यांच्यावरच हल्ला केला. पुण्याच्या रामटेकडी भागात दुपारी साडेचार वाजता ही घटना घडली आहे. कोयता गँगच्या रडारवर पोलीसच आल्यामुळे परिसरात दहशतीचं वातावरण आहे.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page