आम्ही लाडक्या बहि‍णींना 2000 रुपये देणार; काँग्रेसचं मोठं आश्वासन

सांगली : सध्या राज्यभरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरू आहे. या योजनेसाठी राज्यातील एक कोटींपेक्षा जास्त महिलांनी अर्ज दाखल केले आहेत. राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दोन हप्त्याचे पैसे दिले आहेत. सत्ताधारी या योजनेचा लाभ आपल्याला मिळावा म्हणून महिला भगिनींना आवाहन करताना दिसून येतात. तर, विरोधकांकडून ही योजना निवडणुकांच्या तोंडावर आणल्याचे सांगत सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं जातंय. तसेच, आमचं सरकार आल्यास ह्या योजनेच्या रकमेत अधिक वाढ करू, असे आश्वासनही दिलं जात आहे.

Advertisement

आता, थेट काँग्रेसचे राष्ट्राय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी महाराष्ट्र दौऱ्यात सांगलीतून भाषण करताना राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी घोषणा केली. आमचं सरकार आल्यास आम्ही लाडक्या बहि‍णींना दोन हजार रुपये महिन्याला देऊ, असे मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले. मल्लिकार्जुन खर्गे हे सांगलीत दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी, बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. तसेच, राज्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळ्यासंदर्भात आणि लाडकी बहीण योजनेबाबतही भाष्य केलंय.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page