संतापजनक ! सांगलीत 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

सांगली – सांगली शहरातील संजयनगर भागात अल्पवयीन मुलीवर एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आलीय. धक्कादायक बाब म्हणजे यातील आरोपी हा पॅरोल रजेवर जेलमधून बाहेर होता. यात 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर या 35 वर्षीय रेकॉर्डवरील गुन्हेगाराने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संजयनगर पोलिसांनी तातडीने पाऊले उचलत संशयित आरोपीस आटपाडी येथून ताब्यात घेतले आहे. घटनेनंतर नागरिकांनी आणि पीडित मुलीच्या नातेवाईकांनी आरोपीला फाशी देण्याची मागणी करत पोलीस स्टेशन समोर घोषणाबाजी केली. काँग्रेस नेत्या जयश्री पाटील, भाजपा नेते शिवाजी डोंगरे यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत आरोपावर तातडीने कारवाईची मागणी केली.

Advertisement

मागील महिन्यात त्याने पीडित मुलीस तू मला आवडतेस, असे म्हणून विनयभंग केला होता. त्याबाबत पीडित मुलीने कुठेही वाच्यता केली नाही. 23 ऑगस्ट रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास त्याने पीडित मुलीला बोलावून तिला जबरदस्तीने आपल्या घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच याबाबत कुठे वाच्यता करू नये म्हणून धमकी दिली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दिली. तक्रार दिल्यानंतर तीन पथकाच्या माध्यमातून अवघ्या दीड तासात आरोपी संजय माने यास आटपाडी येथून ताब्यात घेतले.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पीडित मुलीच्या नातेवाईकांनी संजय नगर पोलीस ठाण्याच्या आवारात गर्दी करीत आरोपीवर कडक कारवाई करत घोषणबाजी केली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page