उद्योगपती रतन टाटा अनंतात विलीन; पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसस्कार

मुंबई : उद्योगपती रतन टाटा यांच्यावर वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. शासकीय इतमामात रतन टाटा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वरळी येथे मुंबई पोलिसांकडून तयारी केली होती. पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी अनेक महत्त्वाचे प्रतिष्ठित व्यक्ती वरळी येथे उपस्थित होते. दरम्यान, रतन टाटा यांचा लाडका श्वान ‘गोवा’ यानंही त्यांना श्रद्धांजली वाहिली.
सकाळी एनसीपीए येथे रतन टाटा यांचे पार्थिव दर्शनाकरिता ठेवण्यात आले होते त्याठिकाणी देशातील सर्व क्षेत्रातील दिग्गजांनी दर्शन घेतले. त्यांच्या अंतिम यात्रेमध्ये सर्वसामान्य लोक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. रतन टाटा यांच्या जाण्याने उद्योगक्षेत्राचेच नव्हे तर देशाची हानी झाली असल्याची भावना सर्वत्र व्यक्त केली जात आहे.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




