पुणेकरांसाठी खुशखबर ! येरवडा मेट्रो स्थानक प्रवाशांच्या सेवेत दाखल

पुणे : येरवडा येथील मेट्राे स्थानक प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्याने पुणे मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये आणि वारंवारितेमध्ये वाढ केली गेली आहे. वारंवारीता आता अर्ध्या मिनिटांनी कमी झाली आहे. त्यामुळे आता फेऱ्या वाढणार आहेत. बुधवारी येरवडा मेट्रो स्थानक प्रवासी सेवेत दाखल झाले. त्यामुळे पुणे मेट्रोने दोन्ही मार्गिकांवर प्रवासी सेवेच्या वारंवारितेमध्ये वाढ केली आहे. सकाळी व सायंकाळी पुणे मेट्रोमध्ये जास्त गर्दी असणाऱ्या वेळेमध्ये (सकाळी ८ ते सकाळी ११ व दुपारी ४ ते रात्री ८) दोन्ही मार्गिकांवरील (ॲक्वा व पर्पल) मेट्रोची वारंवारिता ७.५ मिनिटांवरून ७ मिनिटे करण्यात आली आहे.

Advertisement

प्रवाश्यांसाठी दर ७ मिनिटाला ट्रेन उपलब्ध होणार आहे. वारंवारिता वाढल्यामुळे दोन्ही मार्गिकांवर ४ फेऱ्यांनी वाढ होणार आहे. या आधी पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते जिल्हा न्यायालय या मार्गिकेवर एकूण ११३ फेऱ्या होत असत, तर २१ ऑगस्टपासून ११७ फेऱ्या होणार आहेत. वनाझ ते रामवाडी या मार्गिकेवर एकूण ११४ फेऱ्या होत असत, त्या आता ११८ फेऱ्या होणार आहेत. कमी गर्दीच्या वेळात (सकाळी ६ ते सकाळी ८, सकाळी ११ ते दुपारी ४ आणि रात्री ८ ते रात्री १०) मेट्रोची वारंवारिता हे पूर्वीप्रमाणेच १० मिनिटांची असणार आहे.

प्रवाशांचा वाचणार वेळ

महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डिकर म्हणाले, की मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये व वारंवारित्यामध्ये वाढ झाल्याने प्रवाश्याना फायदा होणार आहे. प्रवाशांचा मेट्रो स्थानकांवरील होणार विलंब काळ कमी होणार आहे. गर्दीच्या वेळेत दोन्ही मार्गिकांवर ८ फेऱ्यांची वाढ होऊन जास्त नागरिक मेट्रोतून प्रवास करू शकतील.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page