बॅटरी चोरी करणा-या इसमास अटक युनिट १, गुन्हे शाखेची कामगिरी..!

दिनांक ०३/०२/२०२५ रोजी सायं. ०७/०० वा. ते. दिनांक ०४/०२/२०२५ रोजी सकाळी ०९/०० वा. चे. दरम्यान आशिर्वादम अपार्टमेंट, साठे कॉलनी शुक्रवार पेठ पुणे या बिल्डिंग मध्ये फिर्यादी यांचे कार्यालय असुन त्याचे पार्किंगमध्ये लाईट बँकअप साठी ठेवलेल्या ०८ बॅट-या लोखंडी रैंक मध्ये लॉक करुन ठेवलेल्या असताना कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादीचे संमतीशिवाय लबाडीने चोरुन नेल्या होत्या सदर बाबत फिर्यादी यानी फिर्याद दिल्याने खडक पोलीस ठाणे.गु.र.न. ८२/२०२५ बी.एन.एस. कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयाचा समांतर तपास युनिट १ गुन्हे शाखा करीत असताना दिनांक १३/०२/२०२५ रोजी युनिट १ कडील सपोनि कृष्णा बाबर पोलीस अंमलदार सपोफौप्न मखरे, पो. हवा. बाबर, जाधव, दरेकर, पो. असंलदार सोनवणे, असे प्राप्त झालेल्या सीसीटीव्ही फुटेजचे आधाराने आरोपींनी गुन्हा करताना वापरलेली रिक्षाचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार दत्ता सोनवणे यांना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की. सदरची रिक्षा ही हिंगणे सिंहगड रोड पुणे येथील राजीवगांधी वसाहत मधील इसम नामे सुरज याची असून ती आत्ता राजीवगांधी वसाहत येथे लागलेली आहे. अशी बातमी प्राप्त झाले नंतर सवरची बातमी मा. वरिष्ठांना कळवुन वर नमुद स्टाफ असे शासकीय वाहन व खाजगी वाहनाने सदर ठिकाणी गेलो असता सदर ठिकाणी प्नाताच समोरुन एक इसम चालत येत असल्याचे दिसले. बातमीदाराने सांगितलेल्या वर्णना प्रमाणे पोलीस स्टाफला त्याचा संशय आल्याने त्यास नमुद स्टाफचे मदतीने पकडून प्रथम त्यास ओळख सांगुन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारता त्याने आपले नाव सुरज नामदेव साठे वय ३२ वर्षे रा.दांडेकर पुल पुणे सध्या रा. राजीवगांधी वसाहत, हिंगणे खुर्द सिंहगड रोड, पुणे असे असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याचेकडे दाखल गुन्हयाचे अनुषंगाने तपास केला सदर इसमाने गुन्हा हा त्याचे साथीदार नामे सुरेखा मनिष केंदळे व त्याची पत्नी नामे वैशाली सुरज साठे यांचे मदतीने केला असल्याचे सांगितले व कबुल केले. सदर आरोपी कडुन गुन्हयातील चोरीस गेलेल्या एकुण कि.रु.१.२०.०००/- च्या ८ अॅमरॉन कंपनीच्या बॅट-या च किं.रु.२०,०००/- ची गुन्हा करताना बापरलेली रिक्षा असा एकुण १,४०,०००/-चा माल जप्त करण्यात आलेला असुन सदर गुन्हा उघडकीस आणण्यात आला आहे.

Advertisement

सदरची कामगिरी सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे. श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त. गुन्हे. पुणे शहर. श्री. निखील पिंगळे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-१. पुणे शहर श्री. गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-१ कडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस अंमलदार राहुल मखरे, अनिकेत बाबर, दत्ता सोनवणे, शशिकांत दरेकर, निलेश जाधव, महेश बामगुडे अभिनव लडकत, महिला अंमलदार मयुरी जाधव यांनी केली

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page