लक्ष्मी रस्त्यावर तरुणाला लुटणाऱ्या चोरट्यांना अटक

पुणे : लक्ष्मी रस्त्यावर तरुणाला लुटणाऱ्या चोरट्यांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. चोरट्यांनी वारजे परिसरात एका दुचाकीस्वाराला धमकावून त्याला लुटल्याचे तपासात उघडकीस आले. याप्रकरणी कासीम आसिफ अन्सारी (वय २२, रा. मोमीनपूरा, गंज पेठ), अनिकेत अनिल फासगे (वय २२ रा. गंज पेठ), आश्रफ गौस सय्यद (वय २०, रा. म्हाडा वसाहत, वैदुवाडी, हडपसर) यांना अटक करण्यात आली. तर अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे.
याबाबत एका तरुणाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक विजयमाला पवार, गुन्हे शाखेचे निरीक्षक अरुण घोडके, उपनिरीक्षक मनोज बरुरे यांनी ही कारवाई केली आहे. तक्रारदार तरुण सदाशिव पेठेत राहतो. १२ ऑगस्ट रोजी लुटल्याची घटना घडली होती.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




