गाईला वाचवण्याच्या प्रयत्नात शिवशाही बसचा भीषण अपघात; 1 जणाचा मृत्यू, 28 जखमी

अमरावती : अमरावती नागपूर महामार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तर 28 प्रवासी जखमी झाले आहेत. गाईला वाचवण्याच्या प्रयत्नात शिवशाही बसचा अपघात झाल्याचे बोललं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती-नागपूर महामार्गावर आज एका शिवशाही बसचा अपघात झाला. हा अपघात सकाळच्या सुमारास झाला. अपघाताची भीषणता अधिक होती. यामुळे महामार्गावरुन बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली. यामुळे बसमधील प्रवासी जखमी झाले आहेत. तर एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. ही बस नागपूरहून अकोल्याच्या दिशेने निघाली होती. यावेळी अमरावती-नागपूर महामार्गावर क्रमांक 6 वर एक गाय बसच्या मध्ये आली. यावेळी बस चालकाने गाईला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला.
अमरावती-नागपूर महामार्गावर या अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. यातील जखमी झालेल्या प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
चालकाने अपघाताचा घटनाक्रम सांगितला.
शिवशाही बसचे चालक म्हणाले, मी नागपूरहून अकोल्याकडे बस घेऊन जात होतो. त्यावेळी अचानक एक गाय महामार्गावर धावत आली. मी बसवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. पण माझी गाडी पलटी झाली. माझ्या बसमध्ये एकूण 35 प्रवाशी प्रवास करत होते. त्यातील 28 जण जखमी झाले आहेत, अशी प्रतिक्रिया या अपघातग्रस्त झालेल्या शिवशाही बसच्या चालकाने दिली.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




