पुण्यात MPSC च्या विद्यार्थ्यांचं आदोलन; काय आहे मागणी?

पुणे : पुण्यात रात्रीपासून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु आहे. काल रात्री आठ वाजता सुरू झालेलं आंदोलन रात्रभर सुरूच आहे. पुण्यातील नवी पेठ व शास्त्री रोड येथे आंदोलनं सुरु आहे. रात्री आंदोलक विद्यार्थ्यांची संख्या वाढली होती. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी रात्री आंदोलकांना सूचना दिल्या आहेत. मात्र विद्यार्थी 25 तारखेची परीक्षा पुढे ढकण्याच्या मागणीवर ठाम आहेत. MPSC ने आपली परीक्षा पुढे ढकलून त्यात 258 कृषी पदांचा समावेश करावा, अशी मागणी या आंदोलक विद्यार्थ्यांची आहे. तर त्याच दिवशी IBPS ची परीक्षा आहे त्यामुळे एका परीक्षेला विद्यार्थ्याला मुकावं लागेल. त्यामुळं ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थी करत आहेत.

Advertisement

एमपीएससीतर्फे राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ही येणाऱ्या रविवारी २५ ऑगस्ट रोजी घेतली जाणार आहे. या परीक्षेत कृषी सेवेतील २५८ पदांचा समावेश करण्यात यावा अशी मागणी स्पर्धा परीक्षार्थ्यांनी केली आहे. मात्र या परीक्षेसंदर्भात २९ डिसेंबर, २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध होईपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा २०२४ साठीचे मागणीपत्र शासनाकडून मिळाले नव्हते. त्यामुळे कृषी सेवेतील पदांचा समावेश या जाहिरातीमध्ये करता आला नाही. मात्र, मुलांनी या परीक्षेची तयारी केली असल्याने कृषी सेवेच्या मागणीपत्रातील पदांच्या भरती प्रक्रियेबाबत पुढील नियोजन लवकर करण्यात येईल असे देखील आयोगाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, याच दिवशी केंद्रीय लोकसेवा आयोगाची देखील परीक्षा आहे. यामुळे आयोगाने २५८ पदांचा समावेश करण्यासोबतच ही २५ तारखेला होणारी परीक्षा पुढे ढकलावी या मागणीसाठी मुलांनी आक्रमक भूमिका घेत शास्त्री रस्ता येथे ठिय्या आंदोलन केले. यावेळी त्यांनी आयोगाविरोधात घोषणा बाजी देखील केली.

रात्री ११ च्या सुमारास मुलांनी रास्ता रोको केल्याने येथे वाहतूक कोंडी झाली होती. या ठिकाणी गैरप्रकार होऊ नये यासाठी पुणे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलिस उपयुक्त गिल घटणास्थळी उपस्थित होते. दरम्यान, मुलांनी या प्रकरणी निवेदन दिले असून महाराष्ट्र लोकसेवा आयोग मुलांच्या मागणी बाबत काय भूमिका घेणार या कडे लक्ष मुलांचे लक्ष आहे.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page