सराईत वाहन चोरी करणा-या आरोपीस केले जेरबंद..!

दि.१५/०४/२०२६ रोजी सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीतुन एक इनोव्हा क्रिस्टा फोर व्हीलर चोरी झालेबाबत सिंहगड रोड पोलीस स्टेशन गु.र.नं.१५६/२०२६ भा.न्या.सं.क ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे अनुषंगाने सिंहगड रोड पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी वाहन चोरी करणाऱ्या अज्ञात चोरटयाचा घटनास्थळापासुन ते न-हे नांदेडसिटीच्या भागातील एकुण ७० सी.सी.टि.व्ही फुटेज चेक करुन तसेच तात्रिंक विश्लेषणाद्वारे शोध घेत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार उत्तम तारु, राहुल ओलेकर व सागर शेडगे यांना त्याचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नमुद गुन्हयातील चोरीस गेली टोयोटा कंपनीची, पांढ-या रंगाची, इन्होव्हा क्रिस्टा, गाडी चोरी करणारा इसम हा मोपेड गाडी घेवुन शरद हॉस्पीटल पासुन प्रयोजा सिटीकडे जाणारे रोडच्या कडेला थांबला आहे त्याने अंगात फिक्कट पिवळ्या रंगाचा शर्ट व काळया रंगाची पॅन्ट घातलेला आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यांनी सदरची बातमी मा. वरिष्ठांना कळवुन त्यांचे आदेशाने मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जावुन खात्री करता, बातमीतील वर्णनाप्रमाणे एक इसम मोपेड गाडी घेवुन थांबलेला दिसला.
सदर इसमास स्टाफचे मदतीने ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्याचे नाव व पत्ता गौरव जनार्धन कडु वय ३२ वर्षे रा. दगडे पाटील कॉम्पलेक्स नांदेडगाव कारले चौक सिंहगडरोड पुणे असे असल्याचे सांगितले, त्याचे जवळ असलेल्या मोपेड गाडीचा संशय आल्याने त्याचेकडे त्याबाबत विचारपुस केली असता, त्याने सदरची मोटार सायकल ही एक वर्षापुर्वी कलाश्री बिल्डींग नांदेडसिटी पुणे येथील पार्किंग मधुन चोरी केल्याचे सांगितले त्याबाबत नांदेडसिटी पोलीस स्टेशन येथे फोनद्वारे माहिती घेतली असता, सदर बाबत नांदेडसिटी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं.८४/२०२५ बीएनएस कलम ३०३ अन्वये दि.१०/०५/२०२५ रोजी गुन्हा दाखल असलेबाबत माहिती प्राप्त झाल्याने सदरची मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे. तसेच सिंहगड रोड गु.र नं. १५६/२६ दाखल गुन्हयात आरोपीस अटक करुन दाखल गुन्हयातील चोरीस गेलेली टोयोटा कंपनीची, पांढ-या रंगाची, इन्होव्हा क्रिस्टा, कार जप्त करण्यात आली असून त्याचेकडून एकुण दोन गुन्हे उघड झाले असुन त्याचेकडुन एकुण १२,४८,५००/-रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस अंमलदार उत्तम तारु सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. राजेश बनसोडे मा. पोलीस उप-आयुक्त परीमंडळ ३, पुणे शहर श्री. संभाजी कदम मा. सहा पोलीस आयुक्त, सिंहगडरोड विभाग श्री. अजय परमार यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड रोड पोलीस स्टेशन श्री. विनय पाटणकर पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. समीर गायकवाड यांचे सुचनांप्रमाणे पोलीस उप निरीक्षक, संतोष भांडवलकर,
पोलीस अंमलदार उत्तम तारु, आण्णा केकाण, विकास बांदल, सतिश मोरे, राहुल ओलेकर, सागर शेडगे, तानाजी सागर, संदिप कांबळे, समीर माळवदकर, विनायक मोहीते, शिरीष गावडे यांनी केली.




