संतापजनक ! शाळकरी मुलीला दारू पाजून लैंगिक अत्याचार; अल्पवयीनांसह मैत्रिणीविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : शाळकरी मुलीला दारु पाजून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. मुलीच्या मित्रांसह एका मैत्रीणीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल करण्यात आलेले अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याबाबत मुलीच्या वडिलांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अल्पवयीनांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि मुलांची ओळख होती. मुलीला आमिष दाखवून जाळ्यात ओढले. तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर मुलीच्या मैत्रिणीने व इतरांनी मुलीला फूस लावून मित्राच्या घरी पार्टीसाठी नेले. तेथे तिला दारु पाजली. दारुच्या नशेत मुलीच्या मित्राने तिच्यावर बलात्कार केला. मित्राबरोबर असलेल्या एकाने मोबाइलवर याघटनेचा व्हिडीओ काढला, असल्याचे पीडित मुलीच्या वडिलांनी तक्रारीत म्हंटले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंद करत त्या अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव हे करत आहेत.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




