मोक्यातील मागील ०३ वर्षापासुन पोलीसांना गुंगारा देणा-या फरार आरोपीस बंडगार्डन..!

फिर्यादी तुषार हनुमंत हंबीर वय ३५ वर्षे रा.स.नं.१८, गोधळनगर, हडपसर, पुणे हे लोणीकाळभोर पो.स्टे. मोका केस क्र.०६/२०१६ या गुन्हयामध्ये येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे होते. त्यांना चालता येत नसल्याने त्यांना उपचारकामी दि.२५/०८/२०२२ रोजी ससुन हॉस्पिटल येथे अॅडमीट केले होते. सदर ठिकाणी मुख्यालयाचे पोलीस गार्ड नेमलेले होते. वर नमुद ठिकाणी ०५ अनोळखी इसमांनी कोणत्यातरी अज्ञात कारणासाठी फिर्यादी यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने तलवार, कोयता व पिस्टल हत्यारासह इन्फोसीस बिल्डींग, तीसरा मजला, ससुन हॉस्पीटल, पुणे येथे अनोळखी इसमांनी फिर्यादीवर कोयत्याने वार केले तेव्हा फिर्यादी यांना वाचविण्यासाठी सदर ठिकाणी हजर असलेले पोलीस गार्ड व फिर्यादी यांचा मेहुणा मध्ये पडले असता त्यांचे हातावर वार करुन त्यांना जखमी केले. तसेच एका अनोळखी इसमाने फिर्यादीस पिस्टलने गोळी घालुन जीवे मारण्याचे उद्देशाने फायर करण्याचा प्रयत्न केला म्हणुन फिर्यादी यांनी बंडगार्डन पोलीस ठाणे येथे तक्रार दिल्याने गु.र.नं. २४०/२०२२ गु.र.नं.२४०/२०२२ भा.द.वि. कलम ३०७, ३५३, ३३२, १२० (ब),१४१,१४३,१४४,१४९, आर्म अॅक्ट ३ (२५), आर्म अॅक्ट ४(२५), प्रमाणे दिनांक ०६/०९/२०२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नमुद दाखल गुन्हयाचे तपास दरम्यान एकुण १२ आरोपी निष्पन्न करुन त्यातील ११ आरोपीतांना गुन्हयाचे कामी अटक करुन त्याचे विरुध्द संघटीत गुन्हेगारी कायदया अंतर्गत कारवाई करण्यात आलेली होती. त्यापैकी आरोपी नामे रोहित ऊर्फ तम्मा सुरेश धोत्रे वय २६ वर्षे रा. शिवांजली मित्र मंडळाजवळ, वडारवाडी, पुणे हा गुन्हा दाखल झाले पासुन फरार झालेला होता. मा. सहा. पोलीस आयुक्त, लष्कर विभाग, पुणे शहर श्रीमती संगिता शिंदे अल्फोन्सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बंडगार्डन पो.स्टे. पुणे शहर श्री. संतोष पांढरे, यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी श्री. धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार बडे, भोकरे हे आरोपीचा शोध घेत असताना त्यांना प्राप्त झालेल्या माहितीवरुन सदर आरोपीस केसनंद, वाघोली, पुणे येथुन ताब्यात घेवुन त्यास नमुद गुन्हयाचे कामी दिनांक १२/१२/२०२५ रोजी अटक करण्यात आली आहे. दाखल गुन्हयाचा तपास मा. सहाय्यक पोलीस आयुक्त लष्कर विभाग श्रीमती संगिता शिंदे अल्फोन्सो हे करीत आहेत.
सदरची कामगिरी, मा. अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे, श्री. राजेंद्र बनसोडे, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ श्री. मिलिंद मोहिते, मा. सहा. पोलीस आयुक्त लष्कर विभाग श्रीमती संगिता शिंदे अल्फोन्सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष पांढरे, पोलीस निरिक्षक (गुन्हे) निलकंठ जगताप यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार प्रदिप शितोळे, सारस साळवी, प्रकाश आव्हाड, महेश जाधव, ज्ञानेश्वर बडे, मनोज भोकरे, शिवाजी सरक, ज्ञानेश्वर गायकवाड, यांचे पथकाने केली आहे




