पुण्यात प्री स्कूलमध्ये प्रथमच ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार

पुणे : पुण्यातील गोकुळ नगर मध्ये इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये पहिल्यांदाच स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने प्रमुख पाहुणे केंद्रीय महासचिव व बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र प्रमुख रमेश गणगे तसेच बाबुराव क्षेत्रे पाटील आणि भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती राष्ट्रीय कार्याध्यक्ष हे ध्वजारोहणाचे मानकरी ठरले.
प्री स्कूल मध्ये प्रथमच ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे जगन्नाथ मनाळे (निलंगा तालुका उप अध्यक्ष ठाकरे गट) तसेच सागर घाईतडक (सामाजिक कार्यकर्ते) व भिमसिंग राठोड (अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती कामगार विभाग अध्यक्ष) व आंबवले यांच्यासह इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी बाबर एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापिका आरती यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




