धाराशिवमध्ये मराठा समाज आक्रमक, जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ जलसमाधी आंदोलन

धाराशिव – सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसह विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी मनोज जरांगे यांनी सरकारला १३ जुलैपर्यंतचा वेळ दिला होता. मात्र, सरकारला त्यांच्या मागण्या पूर्ण करत आलेल्या नाही. त्यामुळे मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे. त्यांनी पुन्हा एकदा आंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण सुरु केलं आहे. दरम्यान, त्यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ मराठा समाज आक्रमक झाला आहे.

Advertisement

उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खराब झाल्याचे सांगून या उपोषणाच्या समर्थनार्थ धाराशिवमधील मराठा समाज आक्रमक झाला आहे. काही समाज बांधवांनी आज धाराशिव शहरालगत असलेल्या हातलादेवी तलावामध्ये जलसमाधी आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page