सिंहगड रोड पोलीस स्टेशन कडील ०१ वर्षाकरिता तडीपार असलेला आरोपीस केले जेरबंद..!

दि.२७/०४/२०२५ रोजी गुन्हे शाखा युनिट ३, कडील पथक हद्दीमध्ये वरिष्ठांचे मागदर्शन व सुचनांप्रमाणे गुन्हे प्रतिबंधक गस्त घालीत असताना पोलीस अंमलदार अमित बोडरे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमी नुसार सिंहगडरोड पोलीस कडील ०१ वर्षाकरिता तडीपार असलेला आरोपी नामे परशुराम राऊत हा आनंद विहार, जगताप बंगल्यामागे हिगणेखुर्द पुणे येथे येतो अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने ती बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रंगराव पवार गुन्हे शाखा, युनिट -३ यांना कळविली असता, त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.

Advertisement

त्यानंतर युनिट ३ कडील स्टाफ यांनी तडीपार आरोपी याचा त्याच्या राहत्या घराच्या जवळ आनंद विहार, जगताप बंगल्यामागे हिगणेखुर्द पुणे येथे शोध घेतला असता, नमुद आरोपी मिळुन आला. त्यास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव, पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नाव परशुराम ऊर्फ बाळया गणपत राऊत वय २९ वर्षे रा. आनंद विहार, जगताप बंगल्यामागे हिगणेखुर्द पुणे असे असल्याचे सांगितले. त्याचे बाबत सिंहगडरोड पोलीस स्टेशन कडुन माहिती घेतली असता त्यास परिमंडळ ३ पुणे यांचे तडीपार आदेश क्रमांक ३४/२०२४ म.पो.अधि सन १९५१ चे कलम ५६ अन्वये ०१ वर्षाकरिता तडीपार केले असताना सदर आदेशाचा भंग करुन मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन सिंहगडरोड पोलीस स्टेशन गु.र.नं २२३/२०२५ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे-१, श्री गणेश इंगळे यांचे मार्गदर्शना खाली गुन्हे शाखा युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रंगराव पवार, सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पोलीस अंमलदार अमित बोडरे, चेतन शिरोळकर, उमेश मठपती यांनी केली आहे.

σ

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page