पुण्यात रासपची जोरदार तयारी, खडकवासला मतदारसंघावर केला दावा

पुणे : विधानसभा निवडणुक काही महिन्यातच होणार आहे, या पार्श्वभूमीवर अनेक नेते, कार्यकर्ते पक्ष बदलतांना दिसून येत आहे, आज पुण्यातील खडकवासला मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक पार पडली. यावेळी भाजप आणि राष्ट्रवादीतील अनेक कार्यकर्त्यांनी रासपमध्ये प्रवेश केला. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी खडकवासला मतदारसंघावर राष्ट्रीय समाज पक्षाचा दावा केला.

Advertisement

यावेळी पुणे शहराध्यक्ष बालाजी पवार यांनी खडवासला मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली. या पत्रकार परिषदेत राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, महासचिव ज्ञानेश्वर सलगर, पुणे शहराध्यक्ष बालाजी पवार, शहर सचिव राजेश लवटे, संघटक नारायण यमगर, जकप्पा नवले, ज्योतीराम माने उपस्थित होते.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page