नगरपंचायती हद्दीमध्ये मुतारीच गायब..!

*नगरपंचायती हद्दीमध्ये मुतारीच गायब
सविस्तर वृत्त(पत्रकार आनंद दंदाडे).. श्रीपुर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या ठिकाणी दोन कारखाने एक नगरपंचायत असून देखील एकही मुतारी नाही श्रीपूर हे वसाहत इंग्रजांच्या काळात वसलेली आहे या ठिकाणी पूर्वी पासून ही ग्रामपंचायत होती आज 32000 लोकसंख्येच्या या गावाला नगरपंचायत चे स्वरूप आले आहे आत्ताच या ठिकाणी नवीन नगराध्यक्ष नगरसेवक तयार झालेले आहेत परंतु सध्या श्रीपुर हे अनेक प्रदूषणाने ग्रासलेले आहे त्यामध्ये मेन चौक जो श्रीपुर मध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसलेला आहे त्याला लागूनच बृहन महाराष्ट्र गड सिंडिकेट म्हणजेच आत्ताचे भीमा शुगर ची गेट आहे व पूर्वीचा कॅनलच्या कडेचा रस्ता आहे या रस्त्यावरती फक्त खडी अंथरून ठेवलेली आहे त्या ठिकाणी काही वाहने पार्किंग केली जातात तसेच या ठिकाणी महाराजांचे पुतळ्याला लागून जो मोकळा पेस आहे या ठिकाणी लोक लघु शंका करतात तरी श्रीपुर नगरी मधून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे श्रीपुर मध्ये एक तरी सार्वजनिक बाथरूम असावे असा प्रत्येक नागरिकांची इच्छा आहे तसेच या ठिकाणी खूप मोठी व्यापारी वसाहत व हे गाव पंचक्रोशीत असल्यामुळे बाहेरून येणाऱ्या लोकांची गैरसोय होत आहे नागरिकांचे म्हणणं आहे नगरपंचायतने त्वरित याची सोय करावी

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page