हसन मुश्रीफांच्या नावाने निवृत्त शिक्षिकेकडून २० लाख रुपये उकळले

पुणे : सायबर चोरट्यांकडून पोलीस कारवाईच्या भितीने फसविले जात असतानाच आता एका निवृत्त वृद्ध शिक्षिकेला पोलीस उपायुक्ताच्या नावाने कॉल केला. त्यांना मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासाठी मनीलाँड्रींग केले आहे, असे सांगक तुमच्यावर देखील गुन्हा दाखल असून तुम्हाला अटक करावी लागेल अशी भिती दाखवत तब्बल २० लाख रुपये उकळले आहेत. याप्रकरणी नरेंद्र गुप्ता असे नाव सांगण्यासह इतरांवर गुन्हा नोंदवला आहे. याबाबत ७१ वर्षीय महिलेने हडपसर पोलिसांत तक्रार दिली आहे.

Advertisement

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार १२ वर्षापासून हडपसरमध्ये राहतात. त्या राजस्थान येथून शिक्षक पदावरून निवृत्त झाल्या आहेत. तसेच त्या पेन्शनर आहेत. ३१ मे रोजी त्या घरी असताना त्यांना अनोळखी व्यक्तीचा फोन आला. त्याने पोलीस अधिकारी नरेंद्र गुप्ता बोलत असल्याचे सांगितले. तसेच, हिंदीत संवाद साधत तुम्ही मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासाठी मनीलाँड्रींग केले आहे. तसेच बेकायदेशीर पिस्तूल खरेदीसाठी पैसे पुरवून तुम्ही ड्रग्जचा व्यापार करत आहे, म्हणत घाबरवले. हसन मुश्रीम आमच्या ताब्यात आहेत. तुमच्यावरही गुन्हा दाखल झाला असून, तुम्हाला अटक करावी लागेल, अटक झाल्यावर तुम्हाला मुंबई येथे ठेवले जाईल. तुमची पेन्शन बंद होईल अशी भिती दाखवली.

त्यांना विश्वास बसण्यासाठी एक पीडीएफही पाठवली. त्याच्या बोलण्याने ज्येष्ठ महिला घाबरल्या. त्यांनी गुप्तालाच मी कशी वाचू शकेल अशी विचारणा केली. तेव्हा त्याने तुम्हाला यातून जामीन मिळू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला तुमच्या खात्यात जेवढे पैसे असतील ते आमच्या खात्यात पाठवले लागतील असे म्हणत तुम्हाला पुन्हा पैसे परत करण्यात येईल असे सांगितले. संबंधिताने पाठविलेल्या खात्यावर त्यांनी तब्बल २० लाख रुपये पाठविले. पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page