मोठी बातमी! महाराष्ट्राच्या राज्यपालपदी सी. पी. राधाकृष्णन यांची नियुक्ती

मुंबई : झारखंडचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राधाकृष्णन हे रमेश बैस यांची जागा घेतील. तर भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडेंची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी अनेक राज्यांमध्ये नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या केल्या आहेत.
कोण आहेत सी.पी, राधाकृष्णन?
सी.पी राधाकृष्णन (वय ६७) हे मूळ तामिळनाडूचे आहेत. तामीळनाडूच्या तिरुपूरमध्ये 4 मे 1957 रोजी त्यांचा जन्म झाला. वयाच्या 16 व्या वर्षी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात दाखल झाले. सी.पी राधाकृष्णन आतापर्यंत दोन वेळ कोइंबतूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. 2004 ते 2007 या काळात त्यांनी भाजपचे तमिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काही वर्षे काम पाहिले आहे.
कोणत्या राज्यात कोण नवीन राज्यपाल?
- हरिभाऊ किसनराव बागडे यांची राजस्थानचे राज्यपाल म्हणून नियुक्ती
- जिष्णू देव वर्मा यांची तेलंगणाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती
- ओम प्रकाश माथूर यांची सिक्कीमचे राज्यपाल म्हणून नियुक्ती
- संतोष कुमार गंगवार यांची झारखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती
- रामेन डेका यांची छत्तीसगडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती
- सी एच विजयशंकर यांची मेघालयचे राज्यपाल म्हणून नियुक्ती
- सी. पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती
- आसामचे राज्यपाल श्री गुलाब चंद कटारिया यांची पंजाबचे राज्यपाल म्हणून नियुक्ती. चंदीगडच्या केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक म्हणूनही नियुक्ती करण्यात आली आहे.
- सिक्कीमचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची आसामच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे मणिपूरच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभारही देण्यात आला आहे.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




