अतिक्रमण हटावच्या नावाखाली घिसाडी समाजाच्या महिलांना बेदम मारहाण

उदगीर : उदगीर शहरात सध्या प्रशासनाकडून अतिक्रमण हटाव मोहिम सुरु आहे. सरसकट अतिक्रमण हटवावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे, मात्र काही ठराविक घिसाडी समाजाच्या नागरिकांवर अतिक्रमणची कारवाई होत असल्याचा आरोप घिसाडी समाजाच्या नागरिकांकडून केला जात आहे.
Advertisement
दरम्यान अतिक्रमण हटाव ला विरोध केल्यानंतर प्रशासनाने सफाई कामगार महिलांच्या माध्यमातून घिसाडी समाजाच्या महिलांना मारहाण केली आहे. या प्रकारामुळे प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मारहाणीचे व्हिडिओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- सुरेश साळुंखे
Advertisement




