विधान परिषदेतील 11 नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली आमदारकीची शपथ; पंकजा मुंडेंचाही समावेश

मुंबई : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित आमदारांचा आज शपथविधी झाला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली. सकाळी विधान परिषदेच्या विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात हा शपथविधी पार पडला आहे.

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक पार पडली. 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यामध्ये महायुतीने बाजी मारल्यानंतर शरद पवार गटाचे पुरस्कृत शेकपाचे जयंत पाटील पराभूत झाले. महायुतीचे 9 उमेदवार विजयी झाले. तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार निवडणूक आले होते. कॉंग्रेस पक्षाची मतं फुटल्यामुळे महायुतीचे उमेदवार विजयी झाले. या सर्व नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला.

Advertisement

या उमेदवारांनी घेतली शपथ

पंकजा मुंडे – भाजप

योगेश टिळेकर – भाजप

अमित गोरखे – भाजप

परिणय फुके – भाजप

सदाभाऊ खोत – भाजप

भावना गवळी – शिंदे शिवसेन

कृपाल तुमाने – शिंदे शिवसेना

शिवाजी गर्जे – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

राजेश विटेकर – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

प्रज्ञा सातव – काँग्रेस

मिलिंद नार्वेकर – उद्धव ठाकरे पक्ष

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

      Advertisement

      Leave a Reply

      Your email address will not be published. Required fields are marked *

      You cannot copy content of this page